माहिती अधिकार कार्यकर्ता निघाला बोगस वाचनालयाचा सचिव

प्रतिनिधी प्रहार टाईम्स

सरपंच उमराव बावनकर यांनी प्रेस नोट च्या मार्फ़त दिली माहिती

देवरी २१: तालुक्यातील डवकी येथील यशोदा सार्वजनिक वाचनालय या नावाने २००७ पासून सार्वजनिक वाचनालय असून सुरूवातीपासुन सदर वाचनालय हा वादग्रस्त ठरला आहे.
गावकरी लोकांनी वर्ष २०१३ पासून तक्रार अर्ज करून आज पर्यंत सदर वाचनालय लोकोपयोगी नसल्याचे व मिळणारे अनुदान हे फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरिता उपयोगात आणल्याचे गावकारी लोकांनीसिद्ध केल्याने मागील दोन वर्ष पूर्वी अनुदान देने बंद केल्याचे जिल्हा ग्रथालय अधिकारी यांनी ग्रामपंचायत डवकी ला लेखी पत्रद्वारे कळविले आहे. अशी माहिती डवकी ग्रामपंचायतीचे सरपंच उमराव बावनकर यांनी दिली आहे.

सदर वाचनालय चरणदास उदाराम चौहान यांचे मालकीचे असून शासनाच्या अनुदानातून आता पर्यंत लाखो रुपये त्यांनी प्राप्त केले असुनजनतेला कोणताही लाभ झालेला नाही व शासनाला त्यांनी एकप्रकारे आर्थिक चुना लावन्याच काम केलेले आहे. ग्रंथपाल म्हणून रत्नमाला गोसावी कुंभारे यांची निवड केली असून विना कामाने सदर व्यक्ति वेतन उचलत आहेत.
वाचनालयात २०११-१२ वर्षात ४ दैनिक, ६ मासिक येत असल्याची व ,३११ ग्रंथ, 77 बाल साहित्य,२३४ इतर पुस्तके असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रंथालय भाड़याच्या इमारतीत असून दरमाहा भाड़े रु ५०० मिळत आहे. तसेच ५५ वर्गणीदार आहेत असल्याची व १३ दैनिक देवघेव व १५ सरासरी रोजवाचक असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रत्यक्षात सदर वाचनालयाचे काहिही अस्तित्व नसून,स्वत:ला माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगून इतर लोकांना व अधिकारी वर्गाला पारदर्शक व्यवहार व भ्रष्टाचार मुक्ती करण्यास भाग पाडणारा सदर इसम स्वतःच एका बोगस वाचनालय चालवून शासनाचे आतापर्यंत लाखों रुपये घशात ओतले आहेत.आता पर्यंत मिळालेल्या अनुदानातून कोणताही सामाजिक , शैक्षणिक उपक्रम झालेला नसतांना ग्रंथालय अधिकारी यानी वेळोवेळो तपासनी करून वेळीच कार्यवाही केली असती तर आज शासनाचे लाखो रुपये वाचले असते.

शासनाचे अनुदान हे वाचनालय मालक किवा संस्थेच्या प्रमुखाकडून वसूल करावे व त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावे अशी मागणी सरपंच उमराव बावनकर यांनी केलेले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share