माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर संपन्न

देवरी 08: देवरी तालुक्यातील ओवारा येथे संजय पुराम प्रदेश सचिव भाजपा व माजी आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी वाढदिवस व्हावा ह्या हेतुने दरवर्षी प्रमाने ओवारा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोफत डोळे, तपासणी चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया इ. प्रकाराच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते सदर कार्यक्रमाला वीरेंद्रजी अंजनकर, विजयभाऊ शिवणकर माजी जि. प.अध्यक्ष जि. प.गोंदिया, महेश जैन संचालक दि.गोंदिया डि. को. ऑफ बँक ली., अनिल येरने तालुकाध्यक्ष भाजपा देवरी मंडळ , सविता पुराम महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया, प्रवीण दहीकर महामंत्री भाजपा देवरी, बंटीजी भाटिया महामंत्री तालुका देवरी, अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी, यादवभाऊ पंचमवार , शालिक गुरगुले, विनोद भेडारकर, नितेश वालोदे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चष्मे वाटप शिबिर संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला दोन हजार लोकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली व ७७०लोकांना चष्मे वाटप करण्यात आले व सत्तर लोकांना मोतीया बिंदू च्या शस्त्रक्रिया करिता नियोजन करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share