माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान , वृक्षारोपण आणि फळवितरण थाटात संपन्न

देवरी 08: आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे युवा नेतृत्व माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता मंडळ देवरी सालेकसा आमगाव मंडळ येथील सर्व नेते पदाधिकारी, पंचायत समिती सभापती , उपसभापती , नगरपंचायत ,नगरपरिषद येथील सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांनी मिळून ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वितरण व जीप शाळेत वृक्षारोपणचा कार्यक्रमसाजरा केला.

सदर प्रसंगी आफताब मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आलेला होता. सदर रक्तदान शिबिरामध्ये 48 लोकांनी रक्तदान केले व केक कापून माजी आमदार संजय पुराम यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी बुस्टरडोज च्या कॅम्प सुद्धा लावण्यात आलेला होता. प्रतिष्ठित नागरिक , अधिकारी विधानसभा क्षेत्रातील चाहते तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार संजय पुराम यांना शुभेच्छा देण्यासाठी देवरी येथे हजेरी लावलेली होती. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

Print Friendly, PDF & Email
Share