कडीकसा येथे नवीन अंगणवाडी भवनाचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते लोकार्पण

देवरी १५: देवरी तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील क्षेत्र कडीकसा ग्रामपंचायत अंतर्गत कडीकसा येथे बऱ्याच दिवसापासून लोकांची एक अंगणवाडी भवनाची मागणी होती. या मागणीला धरून या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रयत्न करून येथे नवीन अंगणवाडी भवन बांधकामाची मंजूरी मिळवून दिली. या नवीन अंगणवाडी भवनाचे लोकार्पण गुरूवार(ता.१४ जुलै) रोजी आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी देवरी पंचायत समितीचे सदस्य रणजित कासम, कडीकसाचे सरपंच रमाशीलाताई कोरोटी, पोलीस पाटील बलदेव कुंभरे, अशोक नरेटी, ग्रा.पं.सदस्य प्रियंकाताई उके, अंगणवाडी सेविका सुंदरबाई अंबादे, ज्ञानिराम कासम, ग्रामसेवक बी.एम.कैलुके यांच्या सह कडीकसा ग्रा.पं. मधील इतर ग्रा.पं.सदस्य गावकरी व परिसरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share