भाजप शिक्षक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी प्रकाश परीहार यांची नियुक्ती

प्रहार टाईम्स
देवरी 03 :
भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीची देवरी तालुका कार्यकारीनी गठीत करण्यात आली. याप्रसंगी भा.ज.पा.चे तालुकाध्यक्ष अनिल येरणे यांच्या अध्यक्षतेत व उल्हास फडके {सहसंयोजक भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट राज्य} , अरुण पारधी { राज्य कार्यकारिणी सदस्य भाजप शिक्षक आघाडी}; लक्ष्मण आंधळे{ जिल्हाध्यक्ष जनता शिक्षक महासंघ गोंदिया} , दिपक कापसे{तालुकाध्यक्ष ज.शि.महा.देवरी} यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय जनता शिक्षक आघाडीची देवरी तालुका कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.
या कार्यकारिणीमध्ये भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्या जिल्हा सहसंयोजक पदी शरद बोद्रे यांची तर भा.ज.प.शिक्षक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी प्रकाश परीहार यांची नियुक्ती करण्यात आली आहे . उपाध्यक्षपदी प्रभु मुनघटे, ठवरे, तीरगम , शैलेश राऊत, मुंडे,निखारे, यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सन्मान करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Print Friendly, PDF & Email
Share