देवरी येथे कृषि दिवस मोठ्या उत्साहात साजरा

■ देवरी पं.स.च्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन

देवरी, ता.२: स्व.वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधुन पंचायत समितीचे कृषी विभाग व तालुका कृषी विभाग देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने पं.स.च्या सभागृहात शुक्रवार(ता.१ जुलै) रोजी कृषी दिनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती अम्बिका बंजार ह्या होत्या. या प्रसंगी पं.स.चे उपसभापती अनिल बिसेन, जि.प. सदस्या उषाताई शहारे, जि.प. सदस्या कल्पना वालोदे, पं.स.सदस्य भारती सलामे, अनुसया सलामे, प्रल्हाद सलामे, रंजीत कासम, तालुका कृषि अधिकारी जी.जी.तोडसाम, पं.स.चे कृषि अधिकारी प्रमोद कागदीमेश्राम यांच्या सह देवरी तालुक्यातील काही शेतकरी वर्ग उपस्थित होते.
या वेळी उपस्थित पाहुण्यांनी शासनाच्या कृषि विभागाच्या योजने विषयी माहिती देवून शेतकऱ्यांनी कशाप्रकारे आपली शेती केली तर प्रगति करता येईल या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी जी.जी.तोडसाम यांनी तर संचालक कृषि पर्यवेक्षक श्री.येडाम यांनी केले आणि उपस्थितांचे आभार आत्माचे कृषि तत्वज्ञान व्यवस्थापन सहाय्यक श्री.उपवंशी यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share