देवरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार

■ देवरी नगरपंचायतच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन

देवरी, ता.२: स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे व कृषि दिनाचे औचित्य साधुन देवरी नगरपंचायत च्या वतीने माध्यमिक(१०वी) व उच्च माध्यमिक(१२वी) च्या शालांत परीक्षेत प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायत च्या सभागृहात शुक्रवार(ता.१ जुलै) रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके होते. या प्रसंगी उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, सार्वजनिक बांधकाम सभापती आफताब शेख, अर्थ नियोजन, शिक्षण व क्रीड़ा सभापती संजय दरवड़े, महिला व बालकल्याण सभापती तनुजा भेलावे, मुख्याधिकारी अजय पाटणकर, नगरसेवक रितेश अग्रवाल, सरबजीतसिंग भाटिया( शैंकी), मोहन डोंगरे, शकील कुरैशी, पंकज शहारे, नगरसेवीका कौशल्या कुंभरे, सुनिता शाहु, कमला मेश्राम, हिना टेम्भरे, सिता रंगारी, पिंकी कटकवार यांच्या सह देवरी शहरातील १०वी व १२वी च्या परीक्षेतील प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यासह पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान प्रज्ञा संगीडवार, संजय दरवड़े, तनुजा भेलावे, संजू उईके आदिंनी विद्यार्थ्यांना अमुल्य मार्गदर्शन करुण पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. यावेळी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते १०वी व १२वी च्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यासोबत त्यांच्या पालकांचाही सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन नगरपंचायतचे अमोल पटले यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share