शाळा पूर्व तयारी दुसरा मेळावा आदर्श शाळा सावली येथे थाटात साजरा

देवरी 02: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. उदघाटन सविताताई पुराम महिला व बालकल्याण सभापती जि. प. गोंदिया, अध्यक्ष झुलनताई पंधरे सरपंच सावली, चंद्रसेन रहांगडाले पो.पा. , प्रमुख पाहुणे महेंद्र मोटघरे ग.शि अ.देवरी,
मेश्राम व्य.प .स. देवरी, राजेश्वरीताई बिंजलेकर उपसरपंच ग्रामपंचायत , नाजुका ताई गौतम ग्रा.प. सदस्य. अनिल भेलावे शा.व्या. सदस्य , छंनेश्वरीताई वैद्य ., मीनाताई राठोड, व समस्त ग्राम पंचायत सदस्य , शाळा व्य.सदस्य .,स्वयंसेवक सह विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यात प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक कापसे यांनी सादर केले. शासनाकडून रोबोट किट प्राप्त झाली असून पुढील काळात भौतिक सुविधा युक्त आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याचे शासनाचे मनोदय आहे.आदर्श शाळेची वाटचाल मागील इयत्ता मध्ये इयत्ता पहिली चे विद्यार्थ्यांनी केलेल्या गुणवत्ता विकास. भावी काळातील होणारी शाळेची प्रगती याविषयी मार्गदर्शन केले.. माननीय .शी. . यांनी शाळेत पूर्ण शिक्षक उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पुराम मॅडम यांनी शाळे करीता पुढील वर्षात पन्नास हजाराचे अनुदान जिल्हा परिषदेकडून प्राप्त करून देऊ अशी ग्वाही दिली. शाळेविषयी कोणतेही अडचणी असल्यास त्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिले.सर्व शिक्षक वृंदा कडून गोड जेवनाचे आयोजन करण्यात आले. शाळा प्रवेश 23 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.संचालन दीपक लांजेवार आभार नंदकिशोर शेंडे सर यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुका तज्ञ मार्गदर्शक कु. वर्षा वालदे ग्यानीराम चांदेवार, गुरव मॅडम यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share