अंभोरा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन, पं.स.सभापती अंबिकाताई बंजार यांच्या हस्ते शुभारंभ

प्रहार टाईम्स
देवरी
०२: आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत अंभोरा येथील आदिवासी सहकारी संस्थे द्वारे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन देवरी पं.स.चे सभापती अंबिकाताई बंजार यांच्या हस्ते आणि आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरत सिंग दुधनांग यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी(ता.१ जून) रोजी पार पडले.
या प्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे भंडारा येथील प्रादेशिक व्यवस्थापन सोपान संबारे, देवरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुडेवार, अंभोरी येथील आदिवासी सहकारी संस्थे चे उपाध्यक्ष शिवकुमार राऊत, सचिव मधुकर शहारे, संचालक कृष्णा घरत, श्री.गौरासिंग, चिचेवाडा संस्थेचे संचालक प्रेमलाल पिहदे यांच्या सह परिसरातील शेतकरी व गावकरी बहुसंख्येत उपस्थित होते.
यावेळी सभापती अंबिकाताई बंजार म्हणाल्या की, यावर्षी रब्बी धान खरेदीचे शासनाने दिलेले उद्दिष्टे फार कमी आहे. ते उद्दिष्टे वाढविण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. तसेच खरीप हंगामातील धान अजून पर्यंत उचल करण्यात आलेली नाही. तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले. यावर भंडाराचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांनी म्हटले की, रब्बी हंगामातील धन खरेदी करीता वाढीव उद्दिष्टे बाबदचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले आहे. ते लवकरच मंजूर होईल तसेच धान मिलर्स यांचा प्रतिसाद नसल्यामुळे काही ठिकाणाचे धान उचल प्रक्रिया हे संतगतीने सुरू आहे. आदिवासी संस्थेनी शिल्लक धान व्यवस्थित रित्या साठवणूक करून धान खराब होणार नाही यांची काळजी घ्यावी असे आवाहन ही प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष शिवकुमार राऊत यांनी तर संचालन सचिव मधुकर शहारे यांनी केले आणि उपस्थितांचे आभार संचालन कृष्णा घरत यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share