मे महिन्यात गोंदिया जिल्हा झाला कोरोनामुक्त

गोंदिया:मार्च 2020 पासून जगासाठी महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशातही संपूर्ण मे महिन्यात जिल्ह्यात एकही नवीन बाधिताची नोंद झाली नसून 45495 आढळलेल्या बांधितांवर फुटस्टॉप लागला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

कोरोनाच्या दोन लाटांनी जिल्हाही मोठी प्रमाणात प्रभावित झाला होता. या काळात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले तर बहुसंख्य नागरिकांनी आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने जिल्हावासी देखील भीतीच्या सावटाखाली होते. मात्र नागरिकांनी लसीकरणाला दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादर व कोरोना नियमांचे पालन केल्याने तिसर्‍या लाटेला यशस्वीरित्या सामोरे जाता आहे. परिणामी सुरुवातील अधूनमधून मिळणार्‍या बाधितांनंतर मे महिन्यात एकही नवीन कोरोना बाधिताची नोंद झालेली नाही.

Print Friendly, PDF & Email
Share