सामान्य लोकांसह रुग्णानां योग्य उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे व त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे हिच “माझी ईश्वर सेवा” राजु चांदेवार(मा.जि.प.सदस्य)

माणसाला आयुष्यात जनसेवा करण्याची संधी क्वचितच मिळते. मात्र मिळालेल्या संधीचे सोने केले, तर आयुष्याच्या उत्तरार्धात मिळणारे समाधान वेगळेच असते. त्या समाधानाची अनुभूती सध्या माजी जिल्हापरीषद सदस्य राजु चांदेवार घेत आहेत. सामान्य लोकानां योग्य उपचार व त्यानां सेवा पुरविन्यास राजु चांदेवार कृतार्थ असल्याचे त्यांच्या चेह-यावरील समाधानानेच जाणवते.

राजु चांदेवार सध्या गोंदीया जिल्हा ओ.बी.सी.महासंघाचे प्रचार वाहक म्हणून कार्यरत आहेत. सेवेचे समाधान आणि रुग्णाच्या चेह-यावरील हास्य हाच आमच्यासाठी आनंदाचा ठेवा असल्याचे ते सतत सांगतात. १५ वर्षाहून अधिक काळ ते देवरी तालुक्यातील सामान्य लोकांच्या सेवा बजावत आहेत. तालुक्यात अपघातात जखमी लोकांना तात्काळ उपचार मीळवुन देण्यास मदत करने,रुग्णाची तबियत क्रीटीकल असल्यास जिल्हा रुग्णालयात कधी रुग्णवाहिका ने किवां रुग्णवाहीका वेळेवर उपलब्ध नसल्यास स्वताच्या वाहनाने पोहचविण्याचे कार्य करत असुन हजारो रुग्णाचें प्राण राजु चांदेवार यानी वाचवले आहेत.म्हणुनच त्यानां देवरी तालुक्यात अनेक लोक देवदुत याच नावाने संबोधायला लागले आहेत.
ते म्हणतात की, अनाम प्रेम परिवारासारखी लोक, समाजातील उपेक्षितांवर प्रेमाचा शिडकाव करते आणि समाजोपयोगी घटकांचा सन्मान करते. यामुळे नि:स्पृह सेवेची दखल घेणारेही असल्यामुळे काम करण्यास प्रोत्साहन मिळते आणि नवोदितांना प्रेरणा मिळते. हा अनुभव माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे.
राजु चांदेवार यानी १५ वर्षा अगोदर पासुन देवरी तालुका व तालुक्यातील आजुबाजुच्या परिसरातील लोकात व तालुक्याला लागुन असलेल्या NH-6 वर अपघातात जखमी झालेल्या लोकांत कधिच भेद-भाव न करता लोकाना सुरुवातीपासून सेवा बजावली. रुग्णालय नव्याने सुरू होते तेव्हा अनेक आव्हाने निर्माण होतात. मात्र रुग्णाची मनोभावे सेवा केल्यामुळे ती आव्हाने आपोआप दुर होतात.
सामान्य लोकांचे कामे करुन देणे हाच आपल्यासाठी परमेश्वर मानून त्याची मनापासून सेवा केल्याने, त्याची हसतमुख चेह-याने विचारपूस केल्याने त्याचा अर्धा आजार व त्रास दूर होतो असे ते सतत म्हणत असतात.

चांदेवार सांगतात की, तालुक्यातील ग्रामीन रुग्णालयांत विविध प्रकारच्या महागडय़ा यंत्रणा आहेत. औषधे चांगल्या प्रकारची असतात. मात्र रुग्णांकडे किंवा त्यांच्या नातेवाइकांकडे थोडा वेळ काढण्याचा संयम नसतो. त्यामुळे ते खासगी रुग्णालयांकडे धावतात. तेथे उपचार नीट झाले नाही, तर पुन्हा तालुक्याच्या रुग्णालयांमध्येच दाखल होतात. म्हणून ते आवर्जून सांगतात की, तालुका ग्रामीण रुग्णालये ही सर्वसामान्यांसाठी असतात. थोडा संयम राखा आणि ग्रामीण रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालयांमध्येच रुग्णांवर उपचार घ्या. कारण, तेथील कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिका रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा मानतात, म्हणून त्यांची मनोभावे सेवा करतात.

संकलन @ प्रहार टाईम्स

Print Friendly, PDF & Email
Share