देवरी येथे रविवारी तालुका काँग्रेसची महत्वपूर्ण सभा

■ आमदार कोरोटे यांच्या निवासस्थानी सभेचे आयोजन

देवरी १८: देवरी तालुका काँग्रेस कमेटीची महत्वपूर्ण सभा आमदार कोरोटे यांच्या निवासस्थानी येत्या रविवारी (ता.२२ मे) रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या सभेत पक्ष संघटन बळकट करण्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या सभेत देवरी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी- माजी पक्षाचे पदाधिकारी, वरिष्ठ कार्यकर्ता उपस्थित राहणार आहेत.
तरी तालुका व शहरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेत आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका व शहर काँग्रेस, तालुका व शहर, युवक काँग्रेस, तालुका व शहर महिला काँग्रेस, तालुका व शहर एन.एस.यु.आई., तालुका व शहर काँग्रेस सेवादल कमेटीने केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share