राज्यात कुठेही भारनियमन नसून होणारही नाही; नितीन राऊत यांचा दावा

राज्यात वीज खंडीत होण्याबाबत नुसत्याच वावड्या उठत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांत कुठेही भारनियमन करण्यात आलेले नाही आणि यापुढेही भारनियमन होण्याची शक्‍यता नाही असे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील विश्रामगृहावर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

उर्जा मंत्र्यांच्या भेटीच्यावेळीच या विश्रामगृहाचीच वीज काही काळ खंडीत झाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तथापि हा वीज प्रवाह भारनियमानामुळे खंडीत झालेला नव्हता तर ओव्हरलोडिंगच्या तांत्रिककारणामुळे खंडीत झाला होता असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले.

राज्यात सर्वत्र पुरेसा वीज पुरवठा सुरू असून त्यात कोठेही खंड पडलेला नाही. पण त्याबाबत नुसत्याच वावड्या सुरू आहेत असे ते म्हणाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये सुरू असलेल्या वादावर प्रश्‍न विचारले असता त्याला कोणतेही उत्तर त्यांनी दिले नाही. या विषयी मला काहीही माहिती नाही, माहिती घ्यावी लागेल असे नमूद करून त्यांनी या प्रश्‍नांना बगल दिली.

Print Friendly, PDF & Email
Share