देवरीच्या डान्स अक्रोझ अकॅडेमी मध्ये समर कॅम्प संपन्न

देवरी 12: कोरोना काळात शाळा आणि नृत्य कला केंद्र बंद होती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला नाही. कोरोनाचे प्रमाण कमी होताच शाळा आणि नृत्य केंद्र सुरु झाली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. देवरी येथील डान्स अक्रोझ अकेडमी मध्ये समर कॅम्प नुकताच घेण्यात आला असून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्याचा आस्वाद घेतला.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांना विशेष कला कौशल्य शिकविण्यासाठी पालक तत्पर असता. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नृत्य, संगीत आदी महत्वाचे ठरत आहेत. अशाच उपक्रम देवरी येथे राबविण्यात आल्याची माहिती. आशिष ठाकरे यांनी दिली.
सदरसमर कॅम्प मध्ये 50-60 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Print Friendly, PDF & Email
Share