विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांना वैयक्तिक घरकुल करिता १ कोटी ९६ लक्ष रुपये मंजूर

■ आमदार सहषराम कोरोटे यांचा पुढाकार व प्रयत्नाला यश

■ विधानसभा क्षेत्रातील १६४ लाभार्थ्यांना मिळणार लाभ

देवरी, ता.११: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यात राहणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लोकांकरीता पक्के घर नाही. या करीता या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी शासना सोबत सतत पाठपुरावा व प्रयत्न करुण शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजन अंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकामाकरीता प्रत्येक लाभार्थी १ लक्ष २० हजार रुपये प्रमाणे एकूण १६४ लाभर्थ्यांकरीता १ कोटी ९६ लक्ष ८० हजार रूपयाची निधी मंजूर करुण घेण्यास यश मिळवीले आहे.
यात सविस्तर असे की, आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यात राहणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती या समाजातील लोकांची अनेक दिवसापासून राहण्यासाठी पक्के घर नाही. या करीता घरकुल देण्याची मागणी होती. या मागणीला धरून या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी शासनस्तरावर अनेक वेळा पाठपुरावा व प्रयत्न करुण अखेर महाविकास आघाडी सरकारला निधी मंजूर करण्यास भाग पाडले. यात शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजन अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती च्या देवरी तालुक्यात १०० लोकांना तर आमगांव तालुक्यात १५ आणि सालेकसा तालुक्यातील ४९ लोकांना असे एकूण १६४ लोकांची निवड करुण प्रत्येक लाभार्थी १ लक्ष २० हजार रुपये प्रमाणे १ कोटी ९६ लक्ष ८० हजार रूपयाची निधी वैयक्तिक घरकुल बांधकामासाठी मंजूर करुण घेतली.
अशाप्रकारे हा निधी मंजूर करुण घेण्यास या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या सतत केलेला पाठपुरावा व प्रयत्नाला यश मिळाले आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लोकांनी आमदार कोरोटे यांचे आभार माणून अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share