पोलीस मुख्यालयात पोलीस जवानाची गोळी झाडून आत्महत्या?

प्रतिनिधी / गडचिरोली : अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस जवानाने कर्तव्यावर तैनात असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत शंका कुशंका उपस्थित केल्या जात असून अद्याप हत्या की आत्महत्या याबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
हितेश भैसारे असे मृत पोलीस जवानाचे नाव असून त्याने आत्महत्या केली की अजून काही या घटनेमागे आहे. याबाबत पोलीस विभाग तपास करीत आहे. याबाबत पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share