क्रिकेट खेळात उत्तम प्रदर्शन करुण आपल्या जिल्ह्याच्या नाव लौकिक करा- आमदार सहषराम कोरोटे

■ आमगांव येथे क्रीड़ा संकुलनात तीन दिवसीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आमगांव, ता.१४: शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक खेळा द्वारे व्यायाम केले जाते. अशाच खेळात क्रिकेट हा एक खेळ आहे. हा खेळ खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडुंनी निराश न होता. उत्तम रित्या खेळाचे प्रदर्शन करुण आपल्या क्षेत्रासह जिल्ह्याच्या नाव लौकिक करा. असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले. ते आमगांव येथे क्रीड़ा संकुलनात पारस बहुउद्देशीय संस्था हलबिटोला/खमारी द्वारे आयोजित जिल्हा स्तरीय आमदार चषक टेनिस बॉल तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरण रविवार(ता.१३ फेब्रूवारी) रोजी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि आमगांव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या प्रसंगी आमगांव शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रभाताई उपराडे, नवनिर्वाचीत पं.स.सदस्य तारेंद्र रामटेके, जिल्हा काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता शम्भूदयाल अग्रिका, रामेश्वर शामकुंवर, आमगांव तालुका अल्पसंख्यक काँग्रेस सेल चे उपाध्यक्ष पिकेश शेंडे, हिमांशु बिसेन, राधेलाल शिवनकर, प्राचार्य स्वप्नील पारधी, क्रीड़ा शिक्षक विनायक अंजनकर, अंकुश गजभिये सर, काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ता , शहरवासी, क्रिकेट खेळाडू व क्रिडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेच्या आयोजनाकरिता संस्थेचे अतुल बिसेन, डॉ.आनंद मकवाना, लोकचंद मेश्राम, दीपक सिक्का, रंजन टेम्भरे, पंकज बोरकर,जीतू पलांदुरकर, हेमंत चौके, विनेश फुन्डे, अतुल बोरकर, अक्षय, प्रतीक, उज्वल, नयन, शुभम, भैरवी, युगल,युगल झंकर व आसिता आदिंनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share