मस्जित मदरसा कमिटीद्वारे नवनिर्वाचित नगरसेवक सन्मानित

◾️नगरपंचायत देवरी अंतर्गत निवडून आलेल्या नगरसेवकांचा थाटात पार पडला सन्मान

देवरी 14: नगरपंचायत देवरीच्या सर्व प्रभागातील नवनियुक्त नगरसेवकांचे देवरी येथील आफताब मंगल कार्यालयात थाटात सन्मान सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन देवरी मस्जित मदरसा कमिटीद्वारे करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणूनसर्व आमदार सहषराम कोरोटे , वीरेंद्र अंजनकर , यादोराव पंचमवार , अनिल येरणे , प्रवीण दहीकर , रमेश ताराम , गोपाल तिवारी , महेंद्र मेश्राम , जुवेद खान , पठाण सर , माजिद खान तसेच मस्जित मदरसा कमिटीचे सर्व पदाधिकारी , सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खालील नवनिर्वाचित नगरसेवकांचे सन्मानचिन्ह , शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले.

सत्कार मूर्ती :

1 – कौशलबाई नारायण कुंभरे- भाजप
2 – सुनीता ओंकार शाहू- काँ
3 – प्रज्ञा प्रमोद संगीडवार- भाजप
4 – रितेश सुरेश अग्रवाल- भाजप
5 – तनुजा दिनेश भेलावे- भाजप
6 – संजू शेषलाल उईके- भाजप
7 – सरबजीतसिंग प्रि.भाटिया- काँ
8 – आफताब अलताफ शेख- भाजप
9 – कमल देवानंद मेश्राम- भाजप
10 – हिना कैलास टेंभरे- रांका
11 – संजय रतीराम दरवडे- भाजप
12 – सीताबाई प्रकाश रंगारी- भाजप
13- मोहन भिवा डोंगरे- काँ
14 – नितीन गणपत मेश्राम – काँ
15 – पिंकी पारस काटकवार भाजप
16- नूतन अमरलाल सयाम भाजप
17- पंकज हरिकिशन शहारे राका

सर्व नवनिर्वाचित नगरपंचायत नगरसेवकांना शुभेच्छा देऊन भावी पंचवार्षिकमध्ये शहराचे विकासकाम आणि शहरातील जनतेच्या समस्या सोडवून नवा इतिहास कसा रचता येणार यावर चर्चा करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share