सायकलिंग ग्रुपचे पर्यावरण, सारस संवर्धनासाठी माता बम्लेश्वरीला साकडे

गोंदिया 13: जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्षासह पर्यावरण संदेश सायकलींगच्या माध्यमातून देणार्‍या स्थानिक सायकलिंग संडे ग्रुप मातृपितृ दिन, 13 फेब्रुवारी रोजी थेट 80 किमीचा फेरा करीत छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील माता बम्लेश्वरीकडे साकडे घालणार आहेत.

सन 2017 पासून शहरातील सायकलिंग संडे ग्रुपचे सदस्य दर रविवारी सकाळी एक ते दीड तास व 15 ते 20 किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. याच अभियानातील दोन युवक शांती, निरोगी आरोग्य, प्रदुषणमुक्त भारतचा संदेश घेऊन तब्बल हजारो किलो मीटरची यात्रा करून बाघा बॉडर जम्मू- काश्मिरपर्यंत पोहचले. तसेच ग्रुपचे सदस्य पर्यावरण संवर्धनासह जिल्ह्याचे वैभव व शेतकर्‍यांचा मित्र असलेल्या दुर्मिळ होत चाललेल्या सारस पक्षाचे संवर्धनासाठी जनजागृती करीत आहे. शहरवासीयांचाही या अभियानाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून आता ग्रुप सदस्य पर्यावरण व सारस संवर्धनासाठी थेट डोंगरगडच्या माता बम्लेश्वरीला साकडे घालणार आहेत. सायकलिंग संडे ग्रुपद्वारे सारस पक्षाच्या व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल रॅलीद्वारे गोंदिया ते डोंगरगड पर्यंत 80 कि.मी.ची फेरी लावून जनजागृती करणार आहे.

या जनजागृती रॅलीमध्ये सायकलिंग संडे ग्रुपचे रवी सपाटे, मंजू कटरे, विजय येडे, साहिल खटवानी, शिवम पटले, अजित शेनमारे, पियुष हेरोडे, पुरुषोत्तम मोदी, राकेश पेंढारकर, हितेश चौधरी, दिपाली वाढई, भारती लाडे, वैशाली भांडारकर, श्रध्दा यादव, उमेश वाधवानी, नितीन कोल्हेटकर, शिव भांडारकर, भूमी वेगड, निखिल बहेकार, दीपक गाडेकर, कल्याणी गाडेकर, निलेश कावळे, जितेंद्र खरवडे, हितेंद्र खरवडे, करिश्मा भोजवानी, सरोज कटरे, राज तुरकर, आशिष पटले, स्वाती जैन, पूर्वा अग्रवाल, श्रध्दा बनोटे, अरुण बन्नाटे व अशोक मेश्राम सहभागी होणार आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share