RTE प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरु होणार

गोंदिया 13: दरवर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत गोंधळ उडतो. यावर्षी सहा महत्त्वपूर्ण फेरबदल या प्रवेशप्रक्रियेसाठी करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शी करण्याचा पुरेपूर प्रयत्न शिक्षण संचालनालयाने केला आहे. यंदा प्रवेशप्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंतच पूर्ण करायची आहे.

‘सुपर सिक्स’ बदल स्वीकारत ही आरटीई प्रक्रिया यावर्षीपासून सुरु करण्यात आली आहे. राज्यात आरटीई प्रवेशप्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. 1 फेब्रुवारीपासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टल खुले करण्याची तारीख बुधवार 16 फेब्रुवारी करण्यात आली आहे. दरम्यान, आटीई प्रवेशात यावर्षी संचालनालयाने सहा महत्त्वपूर्ण बदल केले आहे. यात रहिवासी पुरावा म्हणून अधारकार्ड, विद्युत बिल यासह राष्ट्रीयीकृत बँकेची खातेपुस्तिका असणे बंधनकारक आहे. जानेवारी महिन्यापर्यंत चालणार्‍या प्रवेशप्रक्रियेसाठी 30 सप्टेंबरची डेडलाइन देण्यात आली. एका विद्यार्थ्याला एकच अर्ज करता येईल. पुन्हा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.

पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे :

आपल्या पाल्याला आरटीईअंतर्गत प्रवेश मिळावा, कागदपत्राच्या पुर्ततेअभावी अर्ज नामंजूर होऊ नये, यासाठी पात्र पाल्यांच्या पालकांनी खबरदारी घेत सर्व सूचनांचे पालन करून दस्तऐवजांसह अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

Print Friendly, PDF & Email
Share