देवरी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

डॉ. सुजित टेटे

देवरी ५: येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन विश्व पानसरे,पोलीस अधिक्षक गोंदिया व अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे संकल्पनेतून लायंस क्लब इंटरनेशनल, रॉयल संजीवनी, गोंदिया, दिनबंधु ग्रामीण विकास संस्था, देवरी व जिल्हा पोलीस दल, गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षीत बेरोजगार नवयुवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे दृष्टिने कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत दिनांक 09/12/2020 रोजी पोलीस उप मुख्यालय, देवरी जि.गोंदिया येथे रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्यात

1) यशस्वी ग्रुप ऑफ कंपनी प्रा.लि.पुणे 2) बी.एम.डब्ल्यु ऑटोमोटिव्ह लि.अहमदनगर 3) एल.जी.इलेक्ट्रॉनिक्स, पुणे 4) हेअर इलेक्ट्रॉनिक्स, पुणे 5) टेक महिंद्रा फाऊंडेशन, नागपुर 6) ब्रिाटेनिया बिस्किटस लिमिटेड, अहमदनगर, 7) हेल्थ डिल प्राय.लिमि., नागपूर व अनेक ऑटोमोबाईल कंपनीचे प्रतिनिधी मुलाखत करीता हजर राहणार आहेत.
सदर पदाकरीता 10 वी 12 वी पास, आय.टी.आय, पॉलीटेक्निक उत्तीर्ण, पदवीधारक तसेच अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. रोजगार प्राप्त करण्याकरिता ईच्छुक सर्व उमेदवारांचे कंपनीचे एम्प्लॉयर कडून प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येतील. व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. सदर मेळाव्यात गोंदिया,भंडारा,चंद्रपुर,गडचिरोली जिल्हयाचे तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयाचे उमेदवार भाग घेवू शकतात. निवड झालेले उमेदवारांकरिता काही कंपनी मध्ये राहण्याची व एक वेळी जेवणाची सुविधा अंशत: शुल्क आकारणी करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जास्तीत-जास्त उमेदवारांनी सदर मेळाव्यात आपला सहभाग नोंदवावा. आयोजित होणा­या रोजगार मेळावा बाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
पदाचे नांव- मॅकेनिक/वेल्डर/फिटर/इंस्टØमेंटेशन/आय.टी.आय. किंवा पॉलीटेक्निक (डिप्लोमा) टेक्निशियन/ टेलिकॉलर, मॅकेनिक, मदतनिस व स्वरोजगाराकरिता प्रशिक्षण ई.
शैक्षणीक पात्रता:- किमान 8 वी उत्तीर्ण ते 10 वी 12 वी पास, आय.टी.आय. उत्तीर्ण, पदवीधारक, पदविका उत्तीर्ण,
तसेच अभियांत्रिकी उत्तीर्ण व पॉलीटेक्निक अभियांत्रिकी उत्तीर्ण वयोमर्यादा:- 18 ते 35 या दरम्यान
असावा.
कागदपत्र:- उमेदवारांनी एक बायोडाटा (रंगीत फोटो लावलेला) मुळ कागदपत्र व कागदपत्रांची छायांकित प्रत सोबत
आणावे.
मुलाखात दिनांक व वेळ :- दिनांक-9/12/2020 (बुधवार) वेळ-10.00 ते 16.00 वा. पर्यंत
रोजगार मेळावाचा संपुर्ण पत्ता :- पोलीस उप मुख्यालय, देवरी जि.गोंदिया
संपूर्ण देशात कोरोना वायरस (कोविड-19) पसरत असून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सुरक्षा व सर्तकता बाळगण्याबाबत केंद्र/महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शिकाच्या अनुषंगाने रोजगार मेळाव्यात येणारे उमेद्वारांनी प्रत्यक्ष मुलाखत दरम्यान सोशल डिस्टेशिंग चा पालन करून अनिवार्य रूपाने मास्क वापरणे गरजेचे आहे. जे उमेदवार प्रत्यक्ष मुलाखत दरम्यान सोशल डिस्टेशिंग चा पालन करणार नाही व मास्कचा उपयोग करणार नाही व दिलेल्या सूचनांचे पालन करणार नाही त्यांना त्याच वेळी परत पाठविण्यात येईल. याची नोंद घ्यावी. मेळाव्या दरम्यान/इंटरव्युच्या वेळी हँण्डवॉश, पानी व सेनिटाईझर ची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.
नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षीत युवक/युवती व इतर नागरीक यांनी नक्षलवादयांच्या भुलथापांना बळी न पडता, प्राप्त होणा­या रोजगाराच्या या संधीचा फायदा घेवून आपले जीवन चांगले जगावे व शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे. असे पोलीस अधीक्षक, गोंदिया व अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प-देवरी यांनी जिल्हयातील नवयुवक/युवतींना आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share