1958 नंतर भाजपचे गड कोसळले , अभिजीत वंजारी यांचा विजय

देवरी ०३-देशाच्या मध्यस्थानी असलेल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ( भाजप)चे मुख्यालय असलेल्या नागपुरात 1958 नंतर पहिल्यांदाच भाजप गड कोसळला आहे. नागपूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.


नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे. येथे महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला तब्बल ६२ वर्षांनंतर सुरुंग लावला आहे. 1958 पासून नागपुर पदवीधर मतदार संघ भाजपच्या ताब्यात होता . केंद्र वा राज्यात कुठेही पक्षाची सत्ता नव्हती, तेव्हाही पक्षाचे उमेदवार विजयी झाले. नागपुरात संघाचे मुख्यालय त्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्यांनी चारदा यामतदारसंघात वर्चस्व गाजवले आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यालय असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधिपासुन हा मतदार भाजपच्या ताब्यात होता. 1958 मध्ये पंडीत बच्छराज व्यास हे जनसंघाचे नेते होते. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर राव फडणवीस हे देखील येथून निवडून आले होते. केंद्रीय मंत्री गडकरीही सलग चार वेळा निवडून आले. एकदा त्यांनी सर्वाधिक विक्रम केला. ते अविरोध निवडूण आले. प्रा. अनिल सोले यांनी पदवीधर मतदार संघात विजयाची पताका कायम राखली होती.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत

अभिजीत वंजारी५५ हजार ९४७
संदीप जोशी४१ हजार ५४०
राजेंद्रकुमार चौधरी२३३
इंजीनियर राहुल वानखेडे३ हजार ७५२
ॲङ सुनिता पाटील२०७
अतुलकुमार खोब्रागडे८ हजार ४९९
अमित मेश्राम५८
प्रशांत डेकाटे१ हजार ५१८
नितीन रोंघे५२२
नितेश कराळे६ हजार ८८९
डॉ. प्रकाश रामटेके१८९
बबन तायवाडे८८
ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार६१
सी.ए. राजेंद्र भुतडा१ हजार ५३७
प्रा.डॉ. विनोद राऊत१७४
ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल६६
शरद जीवतोडे३७
प्रा.संगीता बढे१२०
इंजीनियर संजय नासरे५६
एकूण वैध मते१ लक्ष २१ हजार ४९३
अवैध११ हजार ५६०

Share