देवरी शहरातील नालीच्या नवीन बांधकामाचे आ. कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

■ प्रभाग क्रमांक ५, ७, ८ व १४ मध्ये भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन.

देवरी २५: आमदार सहषराम कोरोटे यांच्या पुढाकाराने देवरी येथे वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजूर झालेले देवरी नगरपंचायत च्या प्रभाग क्रमांक ५, ७, ८ व १४ मधील नालीचे नवीन बांधकामाचे भूमिपूजन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.


या प्रसंगी आमदार कोरोटे म्हणाले की, “देवरी शहराच्या विकासकामा करीता मी प्रयत्नशील असून येथील विकास कार्यात अनेक शासकीय योजनद्वारे निधी आणून सर्वांगीण विकास करण्यास मी कटिबद्ध आहे”.
या वेळी नवनिर्वाचित नगरसेवक नितीन मेश्राम, नगरसेवक आफताब उर्फ अन्नूभाई शेख, नगरसेविका सरबजीतसिंग उर्फ शैंकी भाटिया, रितेश अग्रवाल, नगरसेविका तनुजा भेलावे, कौशल्याबाई कुंभरे, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, माजी नगरसेविका सुमनताई बिसेन, जिल्हा काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, अनुसूचित जाती सेलचे अमित तरजुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन, माजी उपसरपंच परमजीतसिंग उर्फ जित्ते भाटिया, नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, अभियंता श्री. झिरपे यांच्या सह विविध प्रभागात नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share