तालुका काँग्रेस कमिटीने मानले निवडणूक अधिकाऱ्यांचे आभार

देवरी 25: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका नुकतेच संपन्न झाले असून सदर निवडणुकीचे उत्तम नियोजन आणि प्रशासकीय व्यवस्थापन केल्याबद्दल देवरी तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक तालुका काँग्रेस कमिटी द्वारे नगरपंचायत देवरी चे मुख्याधिकारी अजय पाटणकर तसेच देवरीचे नायब तहसीलदार अनिल पवार यांचा आमदार सहषराम कोरोटे यांच्या मार्गदर्शनात स्मृतिचिन्ह देऊन आभार मानण्यात आले. दरम्यान निवडणूक कार्यक्रम अतिशय शांततेत आणि सुनियोजितपणे पार पडल्यामुळे उत्साहाचा वातावरण बघावयास मिळाला. त्यांच्या कार्याबद्दल सदर आभारप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नवनियुक्त नगरसेवक सरबजितसिंग (शैकीं) भाटिया, अविनाश टेम्भरें , शुभम शाहू , कुलदीप गुप्ता आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share