उप -अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गोंदिया येथील परिरक्षण भूमापक अडकला एसीबीच्या जाळ्यात

नागपूर : उप-अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, जिल्हा गोंदिया येथील संजय रमेश खरोले (३७ वर्ष) परिरक्षण भूमापक वर्ग ३ यांनी ५ हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोदियाच्या पथकाने कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांनी मौजा कुडवा येथे विकत घेतलेल्या प्लॉटवर सन २००५ मध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बैंक शाखा कुड़वा येथुन ५० हजार कर्ज घेतले होते. सदर प्लॉटच्या आखिव पत्रिकेवर विदर्भ कोकण ग्रामीण बँकचा बोझा चडवुन रजिस्ट्री गहाण ठेवली होती. तक्रारदार यांनी सदर बँकेच्या कर्जाची परतफेड पुर्ण केली व बँकेकडुन नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त केले.तक्रारदार यांनी प्लॉटच्या आखिव पत्रिकेवरील विदर्भ कोकण ग्रामीण बैंक शाखा कुडवा याचा बोझा कमी करून प्लॉटचा फेरफार करण्यासाठी ०६ ऑगस्ट २०२१ रोजी तालुका भुमी अभिलेख कार्यालय, गोंदिया येथे अर्ज केला होता. तालुका भुमी अभिलेख कार्यालय, गोंदिया येथील लिपीक संजय खरोले यांना तक्रारदार प्रत्यक्ष तिन चार वेळा जावुन भेटले असता त्यांनी सदर फेरफारची कार्यवाही ऑनलाइन होत असल्याने फेरफार करण्यास उशिर होत असल्याचे सांगुन काम करण्यास टाळाटाळ केली.
तक्रारदार यांनी १७ जानेवारी २०२२ रोजी तालुका भूमी अभिलेख कार्यालय, गोंदिया येथे जावुन लिपीक संजय खरोले यांना भेटुन प्लॉटचे फेरफार कधी पर्यंत होईल? असे विचारले असता त्यांनी तक्रारदार यांना प्लॉटच्या आखिक पत्रिकेवर असलेला विदर्भ कोकण ग्रामिण बॅक, शाखा कुडवा याचा बोझा कमी करून फेरफार त्याचे नावावर करण्याकरीता ५ हजार लाच रक्कमेची मागणी केली. सदर फेरफारचे कामाकरीता तक्रारदार यांची लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला. प्र. वि. गोदिया येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांनी गोपनियरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी संजय रमेश खरोले (वय ३७ वर्ष) परिक्षण भूमापक, उप-अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा गोंदिया यानी प्लॉटच्या आखिव पत्रिकेवर असलेला विदर्भ कोकण ग्रामिण बँक शाखा कुडवा यांचा बोझा कमी करून फेरफार नावावर करण्याकरीता रु. ५ हजार लाच रक्कम २४ जानेवारी २०२२ रोजी भुमी अभिलेख कार्यालय, जि. गोदिया येथे स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदियाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्याचे विरूध्द पो.स्टे. गोंदिया शहर, जि. गोदिया येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरचा कारवाई राकेश ओला पोलीस ला. प्र. वि. नागपूर, मिलाद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि., मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, अतुल तवाडे, पोलीस निरीक्षक, नागपूर यांचे पोहवा राजेश शेंदरे, नापोशि रंजित बिसेन, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, मंगेश काहालकर सर्व ला.प्र.वि. गोदिया यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share