२७ जानेवारीला नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत

प्रहार टाईम्स वृत्तसंस्था: राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या झालेल्या निकालानंतर आरक्षणाच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे
नगर विकास मंत्रालयाने आज राज्यातील 139 नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढणे बाबतचे पत्र निर्गमित केले नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्‍चितीसाठी आरक्षणाची सोडत गुरुवार दिनांक 27/ 1 /2012 रोजीचार वाजता मा. प्रधान सचिव (नवीन २) महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे आयोजित केलेली आहे सध्यास्थितीत covid-19 च्या संक्रमणामुळे विहित केलेल्या आरोग्यविषयक निकष विचारात घेता सदर सोडतीत संबंधित अधिकारी/लोक मंत्रालयात उपस्थित राहणे ऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहावे तसेच सबब सदर सोडतीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी दुरदृश्य प्रणालीव्यवस्थेद्वारे आयुक्त कार्यालयातील अधिकारी जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दहा लोकप्रतिनिधींना ऑनलाइन पद्धतीने विभागीय आयुक्त कार्यालय उपस्थित राहण्याचे परिपत्रकाद्वारे सर्वांना कळविले आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाची प्रतीक्षा संपलेली आहे

Print Friendly, PDF & Email
Share