कोरोनाच्या वातावरण निर्मितीला भीक न घातल्याने दवाखाने ओसाड

◾️सर्दी खोकल्याचे रुग्ण ठरत आहेत कोरोनाग्रस्त
◾️फक्त 11 रुग्णच घेत आहेत रुग्णालयात उपचार

प्रहार टाईम्स वृत्तसेवा
गोंदिया 24:
2020 पासून कोरोना विषाणूचा थैमान सुरु झाल्याची वातावरण निर्मिती शासनस्तरावर करण्यात आली. पहिली आणि दुसरी लाटेच्या वातावरण निर्मितीमुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना आपले जीव गमवावे लागले. दरम्यान तिसरी लाट सप्टेंबर 2021 मध्ये लहान मुलांवर येणार असल्याची चांगलीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती परंतु ती फोल ठरली असून आता पुन्हा तिसरी लाट आल्याची चांगलीच वातारण निर्मिती करून शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार बंद करून भीतीचे वातावरण तयार करण्यात आले.
जानेवारी मध्ये वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी खोकला कॉमन फ्लू चे रुग्ण वाढल्यामुळे कोरोनाचा आलेख वाढलेला दिसतो. दरम्यान कोरोनाच्या वातावरण निर्मितीला सर्वसामान्य नागरिकांनी भिक न घातल्यामुळे रुग्णालय ओसाड पडलेली आहेत.
आज पर्यंत जिल्हात 1243 कोरोना बाधित रुग्ण असले तरी फक्त 11 रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. तर दुसरीकडे खाजगी रुग्णालये रुग्णाच्या प्रतीक्षेत असून रुग्णांची वाट बघत आहेत.
कोरोनाच्या वातावरण निर्मितीमुळे जनसामान्य नागरिक चांगलेच हतबल झालेले असून अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झालेले आहे. मास्क आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे शासनाचे आदेश असून त्यामध्ये फक्त सर्वसामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई येत असल्याचे चित्र आहे. कुठल्याही राजकीय नेत्यावर , शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यावर मास्क साठी दंडात्मक कारवाई करण्यात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकाराला सर्वसामान्य नागरिकांना चांगलेच कंटाळले असतांना लालफीतशाहीपुढे हतबल झालेले दिसत आहे.
वास्तविक पाहता शासनाच्या नियमांना सर्वसामान्य नागरिक भीक घालत नसल्यामुळे कोरोना रुग्ण घरीच 1-2 दिवसात स्वस्थ होत आहे. शाळा बंद असल्यामुळे सर्वसामन्य कुटुंबातील मुलांचे काय ?असा सवाल उपस्थित झालेला आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेत वातावरण निर्मिती करून महत्वाची भूमिका बजावणाऱ्या करून खाजगी रुग्णालय आता रुग्णाची प्रतीक्षेत धडपड करीत असल्याचे दिसत आहे.
सध्या जिल्हात 1346 रुग्ण वर पोहचली आहे. त्यापैकी 1313 रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. फक्त 11 रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. यामुळे शासनाने शिक्कामोर्तब केलेली तिसरी लाट फोल ठरली असल्याची गोंदिया जिल्हावासियांनी सिद्ध करून दाखविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share