गोंदिया: घरफोडी करणारी अट्टल चोर गँग अटकेत

अर्जुनी मोर 22: स्थानिक एका घरफोडीच्या तपासादरम्यान अर्जुनी मोर पोलिसांनी विदर्भात घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना 21 जानेवारी रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

स्थानिक ज्ञानेश्वर शहारे यांच्या घरी 16 जानेवारी रोजी अज्ञात आरोपींनी घरफोडी करुन सोन्याचांदीचे दागिने व 43 इंची टीव्ही चोरी केला होता. याप्रकरणी तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे अर्जुनी मोर पोलिसांनी आरोपी फरदिन राजीक शेख रा. वडसा, सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे रा. राजुरा विकास शर्मा राहणार वडसा यांचा शोध घेऊन छत्तीसगड राज्यातील दुर्गमधून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी व चोरलेली टीव्ही जप्त करण्यात आली आहे.

या आरोपींकडून विदर्भातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान न्यायालयाने त्यांना 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलिस हवालदार गोंडाणे, पोलिस नाईक प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम, राहुल चिचमालकर, पोलिस शिपाई लोकेश कोसरे, मोहन कुहीकर यांनी केली. त्यांना गोंदिया सायबर सेलचे पोलिस हवालदार दीक्षित दमाहे यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share