प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत नवीन रस्त्याचे भूमिपूजन

■ आमदार कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

देवरी २२: तालुक्यातील सुरतोली, चारभाटा, टेकाबेदर, मुरदोली ते एन.एच.०६ पर्यन्तच्या रस्त्याची अत्यंत दयनीय व्यवस्था झाली होती. या बाबदची दखल घेत आमदार सहषराम कोरोटे यांनी शासनस्तरावर सतत पाठपुरावा व प्रयत्न करुण या रस्त्याचे नवीन बांधकाम मंजूर करुण घेतले. या रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन शनिवार(ता.२२ जानेवारी) रोजी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते मुरदोली येथे पार पडले.
या रस्त्याच्या बांधकामाकरिता शासनाने एकूण ५ कोटि,८१ लक्ष, ५२ हजार रूपयाची निधि प्राप्त झाली असून या रस्त्याच्या बांधकामाची लांबी ११ कि.मी. आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी मुरदोलीचे सरपंच विनाताई आचले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया, शिवराम विद्यालयाचे प्राचार्य धनराज हुकरे, माजी पं.स. सदस्य.ओमराज बहेकार, उपसरपंच योगिता हुकरे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शकील कुरैशी, बाळकृष्ण गायधने, प्रेमलाल मळकाम यांच्या सह परिसरातील महिला, पुरुष व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share