विजेचा शॉक देऊन केली वाघाची शिकार, ६ शिकाऱ्यांना २४ पर्यंत वनकोठडी

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात ११ जानेवारी रोजी रामघाट येथे विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणी वनविभागाने आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली आहे. त्याच्याकडून वाघाचे २ सुळे दाँत, वाघाच्या जबड्याची हाडे, इतर लहान दात व वाघाच्या अवयवांचे तुकडे करणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींची वनकोठडी संपत आल्याने त्यांना आज न्यायालयात हजर केले असता यातील २ आरोपींना आरोपींना २४ जानेवारीपर्यंत वनकोठडी तर इतरांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.विजेचा शॉक देऊन करायचे वाघाची शिकार ६ शिकाऱ्यांना २४ पर्यंत वनकोठडी

आणखी आरोपी मिळण्याची शक्यता

सदर प्रकरणामध्ये १७ जानेवारीला ५ आरोपींना अटक करून अर्जुनी मोरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत सर्व आरोपींना वनकोठडी मंजुर केली होती. प्रकरणात चौकशी दरम्यान २० जानेवारी रोजी आणखी एक आरोपीस अटक करून अर्जुनी मोरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली होती. आज पुन्हा सर्व आरोपीना न्यालयात हजर करण्यात आले. यापैकी दोन आरोपीना २४ जानेवारीपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे. बाकी आरोपीना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर या प्रकरणात आणखी आरोपी मिळण्याची शक्यता आहे.

दीड किमीपर्यंत होता विद्युतप्रवाह

आरोपी धनराज शिवा चचाने व झानेश्वर मधुकर वाघाडे यांनी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान डॉ. उल्हास गाळेगोणे यांच्या शेतातील विद्युत पंपाच्या मिटरमधून विद्युत प्रवाह चोरी करून वायरच्या माध्यमातून घेतला. विद्युत प्रवाह लोखंडी तारेच्या सहाय्याने शेतात व जंगलात पसरविला. विद्युत प्रवाह सुमारे दिड कि.मी. अंतरापर्यंत मोकळ्या तारेतून जमिनीवरून सुमारे दोन फुट उंचीवरून जंगलात नेला होता. या तारेला स्पर्श होऊन ११ जानेवारीच्या रात्री वाघांचा मृत्यू झाला. १२ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता आरोपी धनराज शिवा चचाने व ज्ञानेश्वर मधुकर वाघाडे यांनी मृत वाघाचे दोन सुळे दात, मिशा कापून सोबत नेले. अद्याप लोखंडी तारेचा शोध घेणे बाकी आहे. 

मांस खाणाऱ्यांचा शोध सुरु

वनगुन्ह्यातील आरोपींनी वीजप्रवाह सायंकाळी ७ पासून सकाळी ५ पर्यंत तारेतून प्रवाहित केला होता. सदर तारेस स्पर्श होउन मनुष्यहानी व इतर हानी होण्याची सुध्दा दाट शक्यता होती. या प्रकरणात आरोपी धनराज शिवा चचाणे, ज्ञानेश्वर मधुकर वाघाडे, शरद पांडुरंग मळकाम, विकास गोपाल नेवारे, विलास रामदास सिखरामे, धनपाल माधो कांबळे हे रानडुक्कर व रानमांजर या वन्यप्राण्यांचे मांस खाणारे असून इतरही मांस खाणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे. आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियमनुसार गुन्हा नोद करून कार्यवाही करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share