शाळा बंद परंतु निवडणुका जोमात ! सोशल मीडिया वर कमालीचा विरोध

देवरी 17: कोरोनाच्या काळात बंद झालेल्या शाळा दीड वर्षानंतर पुन्हा सुरु झाल्या होत्या. घरात राहून कंटाळलेली मुले पुन्हा शाळेच्या मुक्त जगात रमू लागली होती. आणि पुन्हा 1 महिन्यातच शाळा बंद झाल्याने मुले घरात कैद झालेली आहेत.

त्यामुले पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. कोरोनाचा निर्बंध लावून प्रशासनाने सर्व आस्थापने नियम लावून सुरु ठेवलेली आहेत परंतु फक्त शाळा सरसकट बंद केल्यामुळे आपल्या मुलांचे भवितव्याची चिंता पालकांमध्ये बघावयास मिळत आहे.

सोशल मीडिया वर वायरल झालेले फोटो

निवडणूक कार्यक्रमाला परवानगी परंतु शाळांना बंद केल्यामुळे शिक्षणापेक्षा निवडणूका महत्वाच्या आहेत का ? असे सवाल पालक उपस्थित करीत आहेत. सोशल मीडियावर पालकांची कमालीची नाराजी बघावयास मिळत आहे. पोस्टर बॅनर वायरल झालेले दिसून येत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share