जहाल नक्षलवादी करण ऊर्फ दुलसा नरोटेला गडचिरोली पोलीसांकडून अटक

पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणा­या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. 14/01/2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जां.) व सीआरपीएफ 191 बटालियनची ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.
नक्षल दृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगुट्टा येथील रहीवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे वय 30 वर्षे पोमके गट्टा (जांबिया) ता.एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटुन क्र. 14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो गट्टा दलम सदस्य व नक्षलच्या अक्शन टीमचा सदस्य होता. सन 2008 रोजी पोस्टे भामरागड हद्दीत झालेल्या दोबुर जंगल परिसर चकमक व राजु धुर्वा याच्या खुनात त्याचा सहभाग होता, उपपोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तसेच सन 2010 रोजी मिरकल फाटा चकमकीत व तोंडेर येथील रहीवासी चुक्कु याच्या खुनात सक्रीय सहभाग होता. सन 2009 रोजी उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीतील मौजा गुड्डीगुडम येथे सागवन लाकडाने भरलेले ट्रक जाळपोळ प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याचबरोबर दि. 14/08/2020 रोजी पोमके कोठी येथे दुशांत नंदेश्वर या पोलीस जवानाच्या खुनात त्याचा सक्रीय सहभाग होता. दि. 11/06/2020 रोजी किदरटोला येथे झालेल्या रवी झुरू पुंगाटी रा. गुडंजुर, सन 2021 मध्ये पोमके गट्टा (जां.) वर दोन वेळा झालेल्या पोस्ट अटॅक, पोमके बुर्गीवर झालेल्या पोस्ट अटॅकमध्ये तसेच दि. 18/09/2021 मध्ये रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये, दि. 26/02/2021 रोजी लग्नाकरीता पत्नीसह पुरसलगोंदी येथे गेला असतांना अशोक रामु कोरसामी रा. मंगुठा याच्या खुनामध्ये व दि. 03/04/2021 रोजी रामा मंगु तलांडी रा. बुर्गी यांच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता तसेच दि. 11/01/2022 रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील जीपीएस, हॅमर, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य पळवून नेण्याच्या गुन्ह्रात सहभागी होता. जिल्हयातील वेगवेगळया हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असुन त्याच्यावर खालील प्रमाणे एकुण 16 गुन्हे दाखल होते.

Print Friendly, PDF & Email
Share