दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच

पुणे: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आभासी पद्धतीने घेणे अशक्य असल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरू आहे. बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबरचा अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना मुदतवाढही दिली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासन स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय मंडळाला कळविण्यात आला नाही. 17 नंबरचा फॉर्म भरून 12 वी आणि 10 वीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 12 जानेवारीपर्यत अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share