राजनांदगाव-नागपूर मार्गावर सहा दिवसाकरीता मेमू रेल्वेगाड्या रद्द

गोंदिया: राजनांदगाव ते कळमना या रेल्वेमार्गावर सुरु असलेल्या तिसर्‍या रेल्वे लाईनच्या विद्युतीकरणासाठी नॉन इंटरलॉकींग 6 ते 11 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणार्‍या 6 मेमू व 2 इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातंर्गत कळमना ते राजनांदगाव दरम्यान रेल्वेच्या तिसर्‍या लाईनचे काम सुरु आहे.यासाठी इंटरलॉकींग करण्यासाठी या मार्गावर धावणार्‍या 8 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यात दुर्ग -गोंदिया मेमू रेल्वे 7 ते 11 जानेवारी दरम्यान, गोंदिया-इतवारी मेमू 7 ते 11, इतवारी-गोंदिया 7 ते 11, गोंदिया-दुर्ग मेमू 7 ते 11,गेवरा रोड-इतवारी मेमू 6 ते 10, इतवारी-गेवरा रोड मेमू 7 ते 11 आणि इतवारी व बिलासपूर दरम्यान अप व डाऊन दिशेने ने धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस 7 ते 11 जानेवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. याचा सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसणार आहे. पूर्वी एसटीचा संप सुरु असल्याने प्रवाशी रेल्वेचे आरक्षण वेळेवर मिळत नसल्याने मेमू,पॅसेंजर,लोकल गाड्याने प्रवास करण्यास पसंती देत आहे. त्यात आता या मार्गावर धावणार्‍या मेमू रेल्वेगाड्या तब्बल पाच दिवस रद्द झाल्याने प्रवाशांना पुन्हा खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share