सुरतोली माध्यमिक विद्यालयात बालिका दिन साजरा

देवरी 03: सुरतोली माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष दुबे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी कृती गोपाले , प्रमुख अतिथी वर्षा हत्तीमारे , स्नेहल नाईक , रजनी गावाडकर ,रिया नागदेवे ,रश्मी क्षीरसागर ,निशा वैद्य होत्या.

सर्व मान्यवरांनीही आपले विचार मांडले असून विद्यालयातील महिला शिक्षिका अल्का दुबे , शहनाझ मिर्झा , योगेश्वरी कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. कार्यक्रमात भुवनेश्वर पवार , डी एस सोनाग्रे , डी एल नाईक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share