नववर्षात महाराष्ट्रात गारठा वाढणार…येणार थंडीची लाट

मुंबई: राज्यात झालेल्या वादळी आणि गारपिटीच्या पावसामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा थंडी पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील येत्या काही दिवसांत गारठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीने होण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घटणार आहे.

सध्या उत्तर भारतात थंडीची लाट सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. येत्या 2 दिवसांत वायव्य भारतात देखील तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील गारठा वाढणार आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत 2 ते 4 अंश सेल्सिअस किमान तापमानात घट होऊ शकते. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार पावसाची तर वायव्य भारताच्या मैदानी प्रदेशात जोरदार पावसासह हिमवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राजस्थान ते विदर्भादरम्यान निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता क्षीण झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share