PSI सह एकाला 85 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ACB ची कारवाई

पुणे : चाकण पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एका व्यक्तीवर ८५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ८५ हजारांची लाच मागितली होती ती त्याचा मित्र अखतर शेखावत अली शेख याने स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे फरार असून शेख याला अटक करण्यात आली आहे. सोमनाथ झेंडे असे या पीएसआयचे नाव आहे. तर, त्याच्या वतीने अख्तर शेखावत अली शेख (वय ३५) याने ही लाच काल घेतली. दरम्यान, झेंडे हा तपासासाठी बाहेरगावी गेल्याने त्याला अटक झालेली नाही. मात्र, शेख याला पकडण्यात आले आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याच्याविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Police Station, Pune) तक्रार देण्यात आली होतहोता. त्यावर कारवाई न करण्यासाठी झेंडे याने सत्तर हजार रुपयांची मागणी केली. त्यात शेख याने १५ हजार स्वतःसाठी घ्यायचे ठरविले. त्यामुळे एकूण ८५ हजार रुपये त्याने तक्रारदार तरुणाकडे मागितले. मात्र, त्याला लाच द्यायची नव्हती. म्हणून त्याने एसीबीत तक्रार दिली. तिची खातरजमा करण्यात आल्यानंतर काल पोलिस ठाण्यातच हा ट्रॅप लावण्यात आला होता. पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे आणि अतिरिक्त अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. कुणी राज्य शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे पोलिस उपअधिक्षक (प्रशासन) श्रीहरी पाटील यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share