Gondia: आज जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गोंदिया 29 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 29 डिसेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवीन पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज डिस्चार्ज रुग्णांची संख्या शुन्य आहे.

आजपर्यंत 41,247 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 40,530 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 8 आहे. क्रियाशील असलेल्या बाधित रुग्णांपैकी 7 रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील 577 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.6 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.4 टक्के आहे तर डब्लिंग रेट 2934.6 दिवस आहे. 

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 471370 नमूने पाठविण्यात आले. यामध्ये RT-PCR चे 246968 नमूने असून रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) चे 224402 नमूने आहेत. कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. ज्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Print Friendly, PDF & Email
Share