नगरपंचायत निवडणुक 2021 साठी निवडणूक निर्णय अधिकारी घोषित

गोंदिया 7 : राज्य निवडणूक आयोगाचे 24 नोव्हेंबर 2021 चे पत्रानुसार गोंदिया जिल्ह्यातील नगरपंचायत देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी येथील सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करण्यात आले आहे.

सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्येक नगरपंचायतीसाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूकीची सर्व प्रक्रिया संबंधीत नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून राबविण्यात येत असून निवडणूकीशी संबंधीत सर्व माहिती त्यांचेकडून प्राप्त करुन घ्यावी. सुलभ संपर्कासाठी खालीलप्रमाणे संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी घोषित झाले असून, नगरपंचायत निहाय पुढीलप्रमाणे. ◾️देवरी-अभिमन्यू बोधवड (9595151548), ◾️सडक अर्जुनी- महादेव खेडकर (8275200728), ◾️अर्जुनी- शिवराज पडोळे (7798350538) आहेत.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपंचायत निहाय पुढीलप्रमाणे. ◾️देवरी- अजय पाटणकर (9765332928), ◾️सडक अर्जुनी- आशिष चौव्हान (9594911314), ◾️अर्जुनी- शिल्पाराणी जाधव (7972337655) आहेत. असे जिल्हा प्रशासन अधिकारी करणकुमार चव्हाण यांनी कळविले आहे.

नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंत 

राज्य निवडणूक आयोगाने 24 नोव्हेंबर 2021 चे पत्रानुसार घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी या तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 21 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे 3 डिसेंबर 2021 चे पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सडक अर्जुनी व अर्जुनी या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. असे जिल्हा प्रशासन अधिकारी करणकुमार चव्हाण यांनी कळविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share