तंटामुक्त समितीने लावले प्रेमी युगलांचे लग्न भेट वस्तू देऊन दिला मदतीचा हात

डॉ. सुजित टेटे

देवरी: 29
तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंडकेपार अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या सहमतीने तेजराम राधेश्याम राऊत वय 26 वर्षे आणि ज्योती धनिराम घरत वय 22 वर्षे दोघेही राहणार टेकाबेदर पो. बोरगाव ता. देवरी जि.गोंदिया या प्रेमी युगलांचे लग्नाचे वय पूर्ण झाले असून दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते आणि दोघांच्या सहमतीने महात्मा गांधी तंटामुक्त समिती गट ग्रामपंचायत पिंडकेपार व गावकरी यांच्या सक्षम उपस्थिती विवाह सोहळा पार पडला असून गावकऱ्यांनी वधू वरास आशीर्वाद प्रधान केले.

सदर विवाह सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख अतिथी नितेश वालोदे, प्रा.मधू दिहारी, प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्यासह तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष माणिकचंद राऊत, अनिल कोल्हार , अनिल बाबारे, प्रभूदास राऊत, रामेश्वर ईळपाते, शितकुजी मुरापे, सुखलाल राऊत, भाऊराव घासले, विजय ब्राम्हणकार, कैलास घासले, प्रल्हाद घासले यांच्या सह गावकरी उपस्थित होते.

अतिशय साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला असून तंटामुक्त गाव समितीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतूक करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share