देवरी न.पं.च्या कर आकारणीवर राजकारण रंगणार, काय म्हणाले मुख्याधिकारी ??

देवरी 05: शहरात विविध प्रकारचे कर हे नगरपंचायत व ग्रामपंचायतीचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. जनतेला सेवा पुरविल्याबद्दल शासनाला कराच्या स्वरूपात मोबदला दिला जातो परंतु ज्या सेवा जनतेला पुरविल्या जात नाही. त्या सेवाचे कर देवरी शरहवासीयांना कडून नगरपंचायत घेत आहे. या कारणांनी देवरी शहरवासी कमालीचे संताप बघावयास मिळाला. नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत जनता उमेदवारांना या विषयी उत्तर मागणार आहे. या न.पं.च्या नवीन कर आकारणीच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी देवरी नगरपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या शहरातील व्यापारी व सर्वसामान्य जनता यांच्या संयुक्त रित्या आयोजित सभेत घेण्यात आली.

५२ सफाई कामगारांना कामावरून काढल्याने नवीन राजकारण

ऐकीकडे नगरपंचायतीने ५२ सफाई कामगारांना कामावरून काढल्याने शहरात सर्वत्र कचरा व घाण पसरलेला आहे. मग स्वच्छता कर कसा कां? घ्यायचा हा प्रश्न शहरातील जनतेंनी उपस्थित केला आहे.सफाई कामगारांच्या नावावर श्रेय लोटण्यासाठी नवखे उमेदवार त्यांच्या पाठीशी उभे असलेला दिखावा करतांनाचे लोकांमध्ये चर्चा आहे.

नगरपंचायतीच्या शाळा नाही पण शिक्षण कर कसा ?

देवरी नगरपंचायतीने शिक्षण कर, रोजगार हमी योजना कर, अग्निशमन कर, व वृक्ष कर अशाप्रकारे निरर्थ कर लावून देवरी नगरपंचायत जनतेची अप्रत्यक्षपणे लूट करीत असल्याचे देवरी शहर वासीयांचे म्हणणे आहे. यात प्रामुख्याने शिक्षण कर हे मालमत्ता करा पेक्षा ५० टक्के अधिक लावण्यात आल्याने देवरीच्या जनतेमध्ये चांगलाच रोष आहे. नगरपंचायत कडून देवरी शहरात एकही शाळा संचालित करीत नसून तरीही हा शिक्षण कर एवढा कसा काय? हा प्रश्न येथील जनता विचारत आहे.
जुन्या नगरसेवकांना अंधारात ठेवून हा कर प्रणाली आकारण्यात आल्याचे नगरसेवक सांगत आहेत. परंतु आता होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत उभे असलेले जुने व नवीन नगरसेवक उमेदवारांना या वाढीव कर आकारणी बाबद जनतेला सांगावे लागणार आहे. तसेच या विषयाधरून देवरी शहरवासी न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पत्रकातून दिली आहे.
यात विशेष म्हणजे होणाऱ्या नगरपंचायती च्या निवडणुकीत देवरी शहरवासी वाढलेल्या कर प्रणालीला धरून जुने व नवीन नगरसेवक उमेदवारांना प्रश्न विचारणार आहेत. आता या प्रश्नाचे निराकरण नगरसेवक उमेदवार कशा प्रकारे करतात हे पाहणे आवश्यक आहे.

काय म्हणाले मुख्याधिकारी ?? वाचा

देवरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी या वाढीव करा बाबद म्हटले आहे की, सदर कर(टॅक्स) हे शासनाच्या नियमानुसार लावण्यात आले आहे.
सदर निर्धारित कर (टॅक्स)च्या ५० टक्के रक्कम १५ दिवसाच्या आत भरून कर धारक या विरुद्ध उपविभागीय अधीकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन कर समिती कडे अपील करू शकतात. या करिता देवरीचे उपविभागीय अधिकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमेटी स्थापन करण्यात आली असून या कमेटी मध्ये वाढीव कर निर्धारण केले जाणार आहे.

अजय पाटणकर , मुख्याधिकारी
Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •