गुंगीचे औषध देऊन चारचाकी वाहन चोरणाºया आरोपींना अटक

गोंदिया:- रावणवाडी येथुन देवरी येथे घरगुती सामान आणायचे आहे, असे कारण सांगुन फिर्यादीचे चारचाकी पिकअप जिप क्रमांक एमएच ३५ एजे १७८४ भाड्यावर घेतले. फिर्यादी हा आरोपीतांसोबत रावणवाडी येथे जात असता आरोपीनी फिर्यादीला काहीतरी गुंगीचा पदार्थ देउन फिर्यादीचे चारचाकी पिकअप वाहन चोरी केले. ही घटना ६ आॅक्टोंबर रोजीची असुन फिर्यादी विनोद रत्नभोज वाघमारे वय. ३० वर्ष रा. संजय नगर देवरी यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन आमगाव येथे अप.क्र. ३२४/२०२१ कलम ३७९, ३२८, ३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर आरोपींचा शोध घेण्याकरीता आमगाव येथील पोलीस तपास पथक तयार करण्यात आले असता घटनेच्या तपासादरम्यान आरोपी भाष्कर ऋषी नंदेश्वर वय ५३ वर्ष रा. कोकनागढ, धारगाव, जि. भंडारा, पुष्पेंद्रसिंह उर्फ गब्बर मितंजयसिंह चालुक्य वय ४२ वर्ष रा. वार्ड क्र. ४ खैरगड जि. राजनांदगाव, सतबिरसिंह निंदरसिंह शेरगील वय ३६ वर्षे रा. तालपुरी कॉलोनी, रिसाल सेक्टर भिलाई जि. दुर्ग, हे पोलीस स्टेशन तुमसर येथे चारचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक असल्याची माहिती मिळाल्यने आरोपींना भंडारा कारागृह येथुन प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेवुन गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला असता त्यांनी सदर घटनेतील चोरून नेलेले वाहन आरोपी ईसारापु व्यंकटा जयशंकर वय ३८ वर्षे रा. अम्माजी पेटा, इनुगला टुनी पुर्व गोदवारी, विशाखापट्टम, राज्य आंध्र प्रदेश यास विकल्याचे सांगितले असता आरोपीचा शोध घेण्याकरीता विशाखापट्टम येथे जावुन आरोपीचा शोध घेतले असता चोरी गेलेला वाहन चारचाकी पिकअप क्र. एमएच ३५ एजे १७८४ किंमत ५००००० रुपए तसेच आरोपीला आमगाव येथे आणण्यात आले.

सदर घटनेतील चारही आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पवार हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल आमगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नाळे आमगाव, तसेच सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पवार, पो.ना. कटरे/१७००, पो.शि. पांडे/२०३२, डोये/१३४, सायबर सेल गोंदियाचे पो.ना. दिक्षीत दमाहे, धनंजय शेंडे यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •