गोंदिया जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज रहागंडाले

गोंदिया 02: महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेची जिल्हास्तरीय सभा गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात नुकतीच पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एन.सी.बिजेवार होते.या बैठकीत गोंदिया जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या नव्या कार्यकारीणीची रचना करण्यात आली.त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदी मनोज रहांगडाले गोंदिया,सरचिटणीस नेतराम बिजेवार गोरेगाव,
जिल्हा नेते प्रकाश कुंभारे आमगाव,उपाध्यक्ष मनोहर सुर्यवंशी मोरगाव अर्जूनी,कोषाध्यक्ष दिपक कापसे देवरी,
कार्याध्यक्ष मधुरकुमार नागपुरे सालेकसा,महिला प्रतिनिधी प्राजक्ता रणदिवे गोंदिया,दिक्षा फुलझेले आमगाव यांची निवड करण्यात आली.याबैठकीत राज्य कार्यकारिणीच्या सभेतील ठरावानुसार जे दिशा निर्देश देतील व निर्णय घेतील त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील सर्व राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक पाठिंबा देणार असे ठरले.तसेच जिल्हा कार्यकारिणीतर्फे राज्य कार्यकारीणीत प्रतिनिधी पाठविण्याचे ठरले.त्याकरिता सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकानी प्रमाणपत्र, आधार कार्ड व दोन फोटो,शाळेचा ओळखपत्र सरचिटणीसाकडे जमा करावे असा निर्णय घेण्यात आला.याप्रसंगी सर्व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •