चिचगड गावात घानीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरीकांमधे भिती

देवरी/चिचगड 17 :-
देशपातळीपासुन ते गावपातळी पर्यंतं स्वच्छतेकरीता प्रत्येक गावाकरीता लाखो , करोडो रुपयाचा निधी वितरीत केल्या जातो. आणि तो निधी नागरीकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने करणे हे काम स्थानीक प्रशासनाचे असते व त्या निधीतुन शहर व गाव स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्वाचे असते.

‘स्वच्छ भारत..स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडुन आव्हान करन्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठा भर देन्यात येतो. मात्र देवरी तालुक्यातील चिचगड गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने चिचगड गावातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न येरनिवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि गावात ठिकठीकानी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसर्‍या आजाराने तोडं वर काढल्यास जबाबदार कोण..? असा प्रश्न चिचगड गावातील नागरीकांमधुन उपस्थित केल्या जात आहे.

चिचगड गावाला निधी तर मिळतो मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे गावातील अस्वच्छतेवरुन स्पष्ट होते.चिचगड गावातील अनेक भागातील नाल्या ह्या घानीने तुडूबं भरलेल्या असुन ते घाण पाणी रसत्यावर वाहतानाही बघावयास मीळते.तर काही वार्डात कचरा पसरुन रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे. समस्येचा समाधान ग्रामपंचायतीने आद्यक्रम देवून करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत .

Print Friendly, PDF & Email
Share