पत्नीने काढला पतीचा काटा, चारित्र्यावर संशय घेतो म्हणून केला पतीचा खून

देवरी 01: तालुक्यातील लोहारा येथे येन दिवाळीच्या सुरुवातीला एका महिलेने आपल्या पतीचा खून केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दारू पिऊन चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे पत्नीने पतीला रात्री डोक्यावर आणि शरीरावर काठीने जबर मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहिती नुसार आरोपी पत्नीचे नाव वर्षा टेम्भूरकर (32 वर्षे ) असून ती लोहारा येथील रहवासी आहे. पतीच्या नेहमीच्या त्रासामुळे तिने आपल्या पतीचा काठीने मारून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

मृत व्यक्तीचे नाव जगदीश गहलोद (48 वर्षे ) असे असून त्याच्या लोहारा येथील राहत्या घरीच त्याची हत्या झाल्याचे सिद्ध झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच देवरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सदर घटनेचा अपराध क्र. 250/2021 कलम 302, 201 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून घटने चा तपास देवरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या सह लोहारा बिट चे कुंभरे मेजर आणि गुणवंत कठाणे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share