सीटबेल्ट आणि हेल्मेट घातलं नाही तर आता भरावा लागणार ‘एवढा’ दंड

मुंबई : वाहनचालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. वाहन चालवताना शहरातील वाढते अपघात आणि अपघातातील बळींची संख्या याचा विचार करता, वाहतुक नियम मोडणाऱ्यांसाठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता नियमांचे पालन करण्यास सक्तीचं केलं जाणार आहे.

दुचाकी चावणाऱ्यांनी सीटबेल्ट न लावल्यास आणि हेल्मेट न घातल्यास 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पहिलेच काळजी घेत होणाऱ्या नव्या नियमांचं आतापासूनच पालन करावं, असं आवाहन केलं जात आहे.

वाहतुकीच्या नवीन नियमांचं उल्लंघन केल्यास मोटर वाहन अधिनियम कायदा 2019 अंतर्गत सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नवीन नियमांनुसार ड्रिंक करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता नवीन मोटर वानह कायद्यानुसार, पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास किंवा 10,000 रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता सोमवारी दंडात्मक नियमांची सूचना देण्याची शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email
Share