मला आयुष्यभर शिक्षकच रहायचं – खुर्शिद शेख

उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात, त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात कॉफी विथ डायरेक्टर

गडचिरोली 22:

राष्ट्रपती पुरस्कारानंतर माझी शिक्षणक्षेत्रातील जबाबदारी अधिक वाढली असुन शिक्षण हाच राष्ट्रीय विकासाचा पाया हे समाजमनावर बिंबवण्याकरीता मला आयुष्यभर शिक्षक म्हणूनच काम करायचे. अशी सुस्पष्ट भूमिका २०२१चे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शीद शेख यांनी मांडली. उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात, त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात कॉफी विथ डायरेक्टर. या महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाचे वतीने आयोजित पहील्या मुलाखतीत ते बोलत होते. ही मुलाखत स्वतः प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी घेतली.

कोविडच्या प्रादुर्भावानंतर टप्याटप्याने सुरू होत असलेल्या शाळांमधील मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक समृद्धीकरणासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय व राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या अनुभवाचा, ते राबवत असलेल्या उपक्रमांचा लाभ राज्यभरातील शिक्षकांना होण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात, त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात कॉफी विथ डायरेक्टर. हा कार्यक्रम शिक्षकांसाठी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा आसरअल्ली येथील राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार २०२१ चे विजेते शिक्षक खुर्शीद शेख यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी स्वतः कॉफी करीता निमंत्रण देऊन त्यांची मुलाखत घेतली.ही मुलाखत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शिक्षकांनाही प्रेरणादायी ठरावी यासाठी लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती. या मुलाखतीत टेमकरांनी शेख यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांतही उत्साह निर्माण होईल त्याचा फायदा शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना होईल. याकरीता शिक्षण संचालनालय पुणे द्वारे पहिल्यांदाच अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या पहिल्या भागाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अशा प्रेरणादायी कार्यक्रमांची नितांत गरज आहे असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी संदेशा द्वारे कळविले तसेच पुढील भागातही राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षकांच्या मुलाखती ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहेत. परंतु गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्याला पहिल्याच भागात मिळालेली संधी ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे. आजच्या या थेट कार्यक्रमाला प्रसारित करण्यासाठी नदीम खान सर, विक्रम अडसूळ सर, नारायण मंगलराम ह्यांनी तंत्र सहाय्यकांची महत्त्वाची भूमिका बजावली.

मुख्यालयी राहून समस्यांशी लढले तरच शाळा जिवंत करता येतील

जग दुर्गम राहिलेले नाही, ग्लोबल सिटीझनशिपचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजवायचा असेल तर त्यांच्यात राहूनच काम करावे लागेल. शिक्षणाची गती वाढविण्यासाठी मुख्यालयी राहूनच काम करावे लागेल.आपली शाळा आणि कुटुंब यांना समान न्याय देण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. अन्य पर्याय नाहीत.

Print Friendly, PDF & Email
Share