देवरी नगरपंचायतीत गाजलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर कंत्राटदाराचे कंत्राट अखेर रद्द

देवरी 18: मागील काही दिवसापूर्वी देवरी नगर पंचायत अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते यामध्ये 7 मागण्या केलेल्या होत्या. मागण्यापुर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी आंदोलन करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावले होते. सदरची बातमी प्रहार टाईम्स नी प्रकाशित केली होती.

http://prahartimes.com/?p=6480

परिणामी नगरपंचातीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागण्या कंत्राटदाराने पूर्ण न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी प्रहार टाईम्स शी बोलतांना सांगितले.

कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. नागरीकांना त्रास होणार नाही यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालू आहेत.

अजय पाटणकर , मुख्याधिकारी देवरी
Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •