देवरीत 26 ऑक्टो. पासून भव्य विनामूल्य रोग निदान शिबीर

डॉ. सुजित टेटे

देवरी 17: देवरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये NHM अंतर्गत विनामूल्य भव्य रोग निदान शिबीराचे आयोजन येत्या 26 ऑक्टो. पासून 29 ऑक्टो. पर्यंत करण्यात आले असून या शिबिरामध्ये रुग्ण तपासणी पासून दंत रोग सोनोग्राफी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या शिबिरात विशेष करून हायड्रोसिल , हर्निया ,शरीरावरील गाठी , गर्भाशयाचे आजार , दातांची शस्त्रक्रिया आदी रोगावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

येत्या 26 ऑक्टो.ला या निशुल्क शिबिरामध्ये डॉ संजय जयस्वाल उपसंचालक नागपूर आरोग्य सेवा मंडळ ,डॉ अमरीश मोहबे जिल्हा शल्यचिकित्सक गोंदिया ,डॉ आनंद गजभिये वैद्यकीय अधीक्षक , डॉ नितीन कापसे जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया, डॉ. ललित कुकडे तालुका वैद्यकीय अधिकारी देवरी आदी वैद्यकीय चमू उपस्थित राहणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •