आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ संपता संपेना, परिक्षा केंद्रावरून पुन्हा गोंधळ

मुंबई: आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ काही संपता संपत नाही. मागील वेळेस उमेदवारांच्या हॉल तिकीटमध्ये झालेल्या गोंधळामुळे परिक्षा ऐन वेळेला रद्द करावी लागली होती. त्यानंतर ती परिक्षा रद्द करून परिक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता यावेळी देखील पुन्हा आरोग्य विभागाच्या परिक्षेत परिक्षा केंद्रावरून गोंधळ निर्माण झाला आहे.

यावेळी उमेदवारांच्या हॉलतिकीटवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परिक्षा केंद्र दिल्याने गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी उपस्थित राहणं शक्य नाही. उमेदवारांना कोणत्यातरी एकाच परिक्षेला उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या परिक्षेवर पाणी सोडावं लागणार आहे.

यातील अनेक उमेदवारांनी आरोग्य विभागातील दोन वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केले आहेत. आता या उमेदवारांच्या दोन्ही परिक्षा एकाच दिवशी असून दोन वेगवेगळ्या जिल्ह्यामंध्ये परिक्षा केंद्र आलेली आहेत. त्यामुळे उमेदवारांची अडचण होणार आहे.

पहिली परिक्षा 10 ते 12 या वेळेत होणार आहे. तर दुसरी परिक्षा 3 ते 5 या वेळेत आहे. त्यामुळे मधल्या तीन तासात उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर परिक्षेसाठी कसे पोहोचणार? असा प्रश्न समोर उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share